ड्रायफ्रुट्स हे निरोगी चरबी, प्रथिनं आणि फायबर समृध्द अशी पौष्टिक पदार्थ आहेत. त्यामध्ये आढळणारे पोषक तत्वं ही शरीरासाठी प्रचंड फायदेशीर असतात.
ड्रायफ्रुट्स शरीराला शक्ती तर देतोच शिवाय शरीराला अनेक आजारांपासूनही वाचवत असतात.
शुगर, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, हृदयविकार, त्वचा, केसांच्या समस्याही दूर ठेवण्यासाठी याचा मोठा फायदा होतो.
ड्रायफ्रुट्स खाण्याचे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धती असतात, त्या पद्धतीने व्यक्ती सेवन करत असतात.
त्यामुळे काहींना ते कच्चे खायला आवडतात तर काहींना ड्रायफ्रुट्स पाण्यातून किंवा दुधात भिजवून खायला आवडतात.
तर अनेकांना ड्रायफ्रुट्स भाजून, तळून किंवा बाजारातून आणून खायला आवडत असतात.
लोकांना अनेक पद्धतीने ड्रायफ्रुट्स खाण्यास आवडले असले तरी आरोग्य तज्ज्ञांच्या मते तेलात भाजलेले किंवा सुके खाणे हे बिलकुल फायदेशीर नाही.
ड्रायफ्रुट्स भाजलेले किंवा तळलेले खाल्ल्याने त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट जमा होते.
ड्रायफ्रुट्स भाजून खाल्यामुळे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते व त्यामुळे चरबी वाढत असते.
भाजून खाल्यामुळे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते व त्यामुळे चरबी वाढत असते.
बाजारामध्ये मिळणाऱ्या ड्रायफ्रुट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मसाले टाकले जातात. त्याचबरोबर ते जास्त काळ साठवून ठेवल्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर नसतात.
ही दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित असून आहार, उपचार किंवा औषधोपचार घेण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.