रोज असं खा 'हे' स्वस्त फळ; Weight Loss होईलच पण इतर फायदेही मिळतील!
Photo Credit; instagram
पेरू हे एक स्वस्त आणि चविष्ट फळ आहे जे जवळजवळ संपूर्ण भारतात आढळते. तसंच ते अनेक पोषकतत्वांनी समृद्ध आहे.
Photo Credit; instagram
पेरूमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, फायबर आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी आदर्श ठरू शकते.
Photo Credit; instagram
पेरू प्रत्येक ऋतूत मिळत असला तरी थंडीच्या मोसमात तो खूप आवडीने खाल्ला जातो. अनेकांना तो मीठ आणि मसाल्यांसोबत खायला आवडतो.
Photo Credit; instagram
पेरू रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, कॅन्सरचा धोका कमी करण्यास, मधुमेह नियंत्रित ठेवण्यास, हृदयाला निरोगी ठेवण्यास, ताणतणाव आणि वृद्धत्व यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतो.
Photo Credit; instagram
पेरूच्या पानांचा चहा हे एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पेय आहे जे हिवाळ्यासाठी उत्तम आहे. हे केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत नाही तर सर्दी, फ्लू आणि पाचन समस्या देखील दूर करते.