व्हिस्की, ब्रँडी आणि रम तिन्हीही आहेत दारुच, मग नेमका फरक काय?
हिवाळ्यात व्हिस्की, रम आणि ब्रँडीचा अनेक जण आस्वाद घेत असतात. त्यातच हिवाळा असला की, आपापल्या आवडीचीही दारु अनेक जण मोठ्या आनंदाने रिचवत असतात.
व्हिस्की, रम आणि ब्रँडीचा अनेक जण आस्वाद घेत असले तरी काही जण चव आणि हँगओव्हर यामध्ये फरक करत असतात. मात्र तुम्हाला खरचं माहिती आहे का यामधील खरा फरक काय आहे ते.
व्हिस्की, रम आणि ब्रँडी या तीन गोष्टी बनवण्यासाठी नेमकं काय वापरलं जाते, त्याची पद्धत काय हेच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
व्हिस्कीची निर्मिती ही 13 व्या ते 15 व्या शतकात झाली असल्याचे सांगितले जाते. मात्र बनवण्याची ती पद्धत आहे त्यामुळे अनेक जणांना व्हिस्कीची उस्तुकताही असते.
व्हिस्की बनवण्यासाठी बार्ली, कॉर्न, राई आणि गहू वापरतात. जळलेल्या पांढऱ्या ओकपासून बनवलेल्या लाकडी पिशव्यांमध्ये ती ठेवली जाते.
ब्रँडी हे मद्य आहे, मात्र ते बनवताना फळांचा रस आंबवून ब्रँडी तयार केली जाते. ब्रँडी ही सर्वप्रथन फ्रान्समध्ये तयार केली गेली होती.
तर रम ही उसाच्या गुळापासून आणि उसाचा रस आंबवून तयार केली जाते.
रम ही जगभर तयार केली जाते मात्र ती प्रामुख्याने वेस्ट इंडीज, मेरीटाईम्स आणि न्यूफाउंडलँड आणि कॅनडा येथे बनवली जाते.
फूड आणि वाईन तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ही माहिती दारु पिण्यासाठी प्रोत्साहन देत नाही.
वाढदिवसाला बिकिनी घालून केक कापला, अभिनेत्रीने झाली प्रचंड ट्रोल