आहार घेताना 'ही' चूक कधीच करू नका

तुमच्या शरीरासाठी सकाळची वेळ खूप महत्त्वाची मानली जाते कारण या काळात तुम्ही दीर्घ काळानंतर काही तरी खात असता.

आयुर्वेदानुसार तुम्ही सकाळी काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे कारण यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते आणि तुम्हाला दिवसभर कोणत्या ना कोणत्या समस्या येत असतात.

आयुर्वेदानुसार सकाळी कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्याने पचनशक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो.

सकाळी जड, तेलकट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रियेवर खूप वाईट परिणाम होतो. 

आयुर्वेदानुसार सकाळी दह्याचे सेवन केल्याने शरीरात श्लेष्मा तयार होतो आणि पचनामध्ये समस्या निर्माण होतात.

सकाळी कोशिंबीर सारख्या थंड आणि कच्च्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. यामुळे पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो आणि पोषक तत्वांचे शोषण मंदावते.

थंड आणि कच्चे अन्न खाणे. सकाळी खूप गोड पदार्थ खाणे टाळावे. यांचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते. त्याचा परिणाम म्हणून दिवसभर थकवा जाणवत राहतो.

सकाळी लोणचे किंवा व्हिनेगरने तयार केलेल्या वस्तूंचे सेवन टाळावे. यामुळे पित्तदोषाच्या समस्येला सामोरे जावे लागते.

दह्याप्रमाणेच सकाळी ताक पिल्याने त्याचा पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो.

सकाळी आंबट फळे खाणे देखील तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

पुढील वेब स्टोरी

साराच्या साडी Look ने लावलंय साऱ्यांना वेड!

इथे क्लिक करा