सकाळी गरम पाणी पिणे हे फायदेशीर असते, त्याचा फायदा तुमच्या शरीराला होतोच, त्यामुळे पचनक्रियाही सुधारत असते.
गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील सर्व विषारी द्रव्ये बाहेर पडतात.मात्र काही वेळा लोकं सकाळी गरम पाणी पिताना काही चुका करतात, ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होते.
सकाळी पाणी पिताना हे लक्षात ठेवले पाहिजे की, ते जास्त गरम नसावे. खूप गरम पाणी प्यायल्याने तोंड, घसा आणि पचनसंस्थेतील काही गोष्टींना नुकसान पोहचते.
गरम पाणी पिताना ते स्वच्छ आहे किंवा नाही ते आधी तपासावे. त्यानंतर स्वच्छ पाणीच गरम करून ते कोमट झाल्यावरच प्यावे.
रात्री झोपल्यानंतर रात्रभर आपले तोंड बंद असते, त्यामुळे तोंडात बॅक्टेरिया असतात. त्यामुळे ब्रश करूनच पाणी प्यावे नाही तर बॅक्टेरिया पोटात जाऊ शकतात.
गरम पाण्याचे सेवन करताना ते हळूहळू पिणे महत्वाचे असते. कारण त्यामुळे शोषण करण्यास वेळ मिळत असतो.
प्लास्टिकच्या डब्यातून किंवा प्लास्टिकच्या ग्लासमधून कधीही गरम पाणी पिऊ नका, त्यासाठी तुम्ही स्टीलचेच ग्लास वापरा.
Disha patani-mouny roy : बिकिनी अन् बीचवर मस्ती, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ