Photo Credit; instagram

HairFall ने वैतागलाय? फक्त 'ही' गोष्ट करा! काही दिवसांमध्ये दिसेल फरक

Photo Credit; instagram

केस गळणे ही सध्याच्या घडीला एक सामान्य समस्या बनली आहे. यामागचे कारण म्हणजे पोषणाची कमतरता, तणाव, हार्मोनल असंतुलन किंवा आरोग्याशी संबंधित समस्या...

Photo Credit; instagram

तुमचे केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार महत्त्वाची भूमिका बजावू शकते. 

Photo Credit; instagram

अंड्यांमध्ये प्रोटीन आणि बायोटिन मुबलक प्रमाणात असतात जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. बायोटिन केसांच्या मुळांना मजबूत करते आणि प्रोटीन केसांची वाढ राखण्यास मदत करते. रोजच्या आहारात अंड्यांचा समावेश करून केस गळणे टाळता येते.

Photo Credit; instagram

पालकामध्ये लोह, जीवनसत्त्व ए, सी आणि फोलेट मुबलक प्रमाणात असतात जे केसांच्या वाढीसाठी आणि टाळूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. लोहाच्या कमतरतेमुळे केसगळती वाढू शकते आणि पालक या कमतरतेवर मात करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

बदाम, अक्रोड आणि सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या नट आणि बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक केसांची मुळे मजबूत करतात आणि टाळूची जळजळ कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे केस गळती नियंत्रित होते.

Photo Credit; instagram

सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन सारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन डी असतात जे केसांच्या वाढीस मजत करतात आणि त्यांना निरोगी ठेवतात. माशांमध्ये असलेले प्रोटीन केसांसाठी देखील आवश्यक असते.

Photo Credit; instagram

दह्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी 5 (पॅन्टोथेनिक ऍसिड) आणि व्हिटॅमिन डी असते, जे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. दही टाळूला मॉइश्चराइज ठेवते आणि केसांची मुळे मजबूत करते, ज्यामुळे केस गळणे कमी होतात.

पुढील वेब स्टोरी

126 देशांच्या मॉडेल्सला हरवलं! विक्टोरिया बनली Miss Universe 2024

इथे क्लिक करा