Photo Credit; instagram

चहा-कॉफी नाही तर... 'ही' 5 पेय आरोग्यासाठी ठरतात बेस्ट!

Photo Credit; instagram

आपल्यापैकी जवळपस सर्वचजण चहा-कॉफी पितात. अनेकांना ते प्यायल्यानंतर ताजेतवाने वाटते. 

Photo Credit; instagram

पण चहा-कॉफी पिण्याबाबत आपल्याला अनेकजण सल्ले देत असतात. कारण ते गरजेपेक्षा जास्त पिणं ठीक नाही.

Photo Credit; instagram

अशावेळी याला पर्याय म्हणून 5 पेय तुम्ही पिऊ शकता जे तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करेल.

Photo Credit; instagram

ग्रीन टी वजन कमी करण्यास मदत करते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे मेटाबॉलिझम वाढते. हे हृदयासाठी देखील चांगले आहे. 

Photo Credit; instagram

रोज 1 ते 2 कप ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, लॉरिक ॲसिड, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहते. 

Photo Credit; instagram

बीटरूटचा रस हे अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, जीवनसत्त्व आणि खनिजांसह पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामुळे स्नायूंची शक्ती वाढते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. 

Photo Credit; instagram

लिंबू पाण्यात अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन बी सारखे पोषक घटक आढळतात. हे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते.

Photo Credit; instagram

मध आणि दालचिनी पाण्यात मिसळून प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसंच संधिवाताशी संबंधित वेदना कमी होण्यास मदत होते. 

पुढील वेब स्टोरी

सलमान खानच्या 'या' हिरोईनचा 54व्या वर्षीही ग्लॅमरस अंदाज! काय आहे सिक्रेट?

इथे क्लिक करा