सकाळी रिकाम्या पोटी पाण्यातून हळद प्या, अन् फायदे बघा...
हळद आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असल्याने त्याचा शरीराली नेहमीच फायदा होत असतो.
हळद ही कर्क्युमिन नावाचा एक नैसर्गिक कंपाऊंड असतो, त्यामुळे त्याचा रंग गडद पिवळा दिसत असतो. आयुर्वेदातही हळदीला सर्वोत्कृष्ट नैसर्गिक प्रतिजैविक मानले जाते. त्यामध्ये अँटीबॅक्टीरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्मही आढळतात.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास पाण्यामध्ये हळद मिसळून ते पिल्यावर अनेक समस्यांपासून सुटक होत असते.
हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, त्यामुळे जळजळ आणि संधिवाताचा त्रास असेल तर त्यापासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो.
हळद अँटिऑक्सिडेंट्समध्ये समृद्ध असल्याने धोकादायक रॅडिकल्सपासून तुम्हाला संरक्षण मिळते. तसेच कर्करोग आणि हृदयरोगासारख्या रोगांपासूनही तुम्हाला त्याचा फायदा होतो.
दररोज सकाळी हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यास त्याचा फायदा मेंदूला होऊन त्यामुळे स्मृती सुधारते.
सकाळी दररोज हळद पिण्यामुळे हृदयाचे आरोग्यही सुधारते, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्ताच्या गुठळ्या असतील तर त्याही कमी होतात.
हळदीमुळे त्वचेवर जमा झालेले जीवाणू काढून टाकले जातात, त्यामुळे मुरुमांपासून मुक्तता मिळते.