हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप होणे ही सामान्य बाब आहे. विशेषतः कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी हा ऋतू कधीकधी खूप आव्हानात्मक असतो.
Photo Credit; instagram
अशावेळी, जर तुम्हाला हिवाळ्यात फिट राहायचं असेल तर आजपासूनच गूळ आणि हरभरा खाणे सुरू केले पाहिजे कारण या दोन्ही गोष्टी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आहेत.
Photo Credit; instagram
तुम्ही तुमच्या घरातील वडिलधाऱ्यांना हे सांगताना ऐकले असेल की त्यांच्या काळात नाश्त्यात गूळ आणि भाजलेले हरभरे खूप खाल्ले जायचे.
Photo Credit; instagram
खरं तर, गूळ आणि हरभरा हे प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि हेल्दी फॅटचा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे शरीराला आतून ताकद आणि अनेक आजारांपासूनही संरक्षण मिळते.
Photo Credit; instagram
कॅल्शियम, फायबर, प्रोटीन आणि अनेक खनिजे भरपूर असल्याने हाडे मजबूत होतात.
Photo Credit; instagram
यामध्ये असलेले झिंक त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, यामुळे चेहऱ्यावर चमक येते.
Photo Credit; instagram
गूळ आणि हरभरा एकत्र खाल्ल्याने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझम वाढते. ज्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होते.
Photo Credit; instagram
गूळ आणि हरभरे पचनशक्ती मजबूत करतात आणि पोटात चांगले बॅक्टेरिया वाढवतात.