'हा' फेस मास्क एकदा ट्राय कराच, त्वचा होईल एकदम टाइट!
Photo Credit; Canva
प्रत्येकजण सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी बरेच उपाय करतो. यासाठी बाजारात बरेच प्रोडक्ट्स उपलब्ध असतात. मात्र, घरगुती आणि नैसर्गिक साहित्यांचा वापर करणे त्वचेसाठी अधिक फायदेशीर असते.
Photo Credit; Canva
'ॲव्होकाडो' हे फळ पौष्टिक तसेच आरोग्यासाठी खुपच फायदेशीर असल्याचं मानलं जातं. यासोबतच, त्याचे त्वचेसाठीसुद्धा बरेच फायदे मिळतात.
Photo Credit; Canva
ॲव्होकाडो मधील व्हिटॅमिन्स आणि हेल्दी फॅट्स त्वचेला पोषण देतात आणि त्वचा मुलायम बनवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे, घरीच याचा मास्क बनवून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकता.
Photo Credit; Canva
या फळामध्ये व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन C तसेच हेल्दी फॅट्स असतात. यामुळे त्वचा मॉश्चराइज होण्यास मदत मिळते. ॲव्होकाडो मधील हे घटक त्वचेवरील डाग कमी करुन त्वचा तजेलदार ठेवते.
Photo Credit; Canva
हा मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा पिकलेला ॲव्होकाडो, 1 मोठा चमचा मध आणि 1 चमचा दही.
Photo Credit; Canva
आता ॲव्होकाडो मॅश करुन स्मूद पेस्ट तयार करुन घ्या. त्यात मध आणि दही टाकून तुमचा फेस पॅक तयार करा.
Photo Credit; Canva
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर आणि आवश्यकतेनुसार मानेवर लावा. आता हा मास्क 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवून नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या
Photo Credit; Canva
हा ॲव्होकाडो मास्क त्वचेला खोलवर मॉइश्चराइज करण्यात मदत करतो आणि डेड स्किन सेल्स दूर करुन त्वचा मुलायम बनवतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
भरपूर पैसा मिळेल फक्त घरात दक्षिण दिशेला ठेवा ‘ही’वस्तू!