Photo Credit; instagram

लिंबू आणि बेकिंग सोड्यामुळे खरंच दातांचा पिवळेपणा जातो का?

Photo Credit; instagram

पांढरे स्वच्छ आणि चमकदार दात चेहऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. 

Photo Credit; instagram

पण, पिवळ्या दातांच्या समस्येनेही अनेकजण त्रस्त असतात. असे लोक कुणासमोरही हसणे टाळतात.

Photo Credit; instagram

पिवळ्या दातांच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी लोक अनेक घरगुती उपायांचा अवलंब करतात. लिंबू आणि बेकिंग सोडा देखील यापैकी एक आहे.

Photo Credit; instagram

दात स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोडा वापरणे योग्य आहे की नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो.

Photo Credit; instagram

जाणून घेऊया दात स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोडा वापरण्याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे?

Photo Credit; instagram

तज्ज्ञांच्या मते, बेकिंग सोडा दातांवर लावून हलका चोळल्याने पिवळेपणा दूर होतो. पण बेकिंग सोडा एकाच वेळी जास्त वापरु नये.

Photo Credit; instagram

बेकिंग सोडा जास्त वापरल्याने दातांचा बाहेरील थर खराब होतो. अशा परिस्थितीत दातांची संवेदनशीलता वाढू शकते.

Photo Credit; instagram

लिंबू आम्लयुक्त आहे, हे दातांच्या इनेमलसाठी योग्य नाही. यामुळे, तुमचे दात पूर्वीपेक्षा अधिक पिवळे आणि कमकुवत होऊ शकतात.

Photo Credit; instagram

बेकिंग सोडा आणि लिंबू यांचे मिश्रण दातांवर एकत्र वापरणे धोकादायक ठरू शकते. हे मिश्रण दातांवर चोळल्याने हिरड्यांमध्ये जळजळ किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो.

Photo Credit; instagram

दातांवरील पिवळसरपणा दूर करण्यासाठी सोडा किंवा लिंबू यांसारख्या घरगुती उपायांचा वापर टाळावा.

पुढील वेब स्टोरी

शाही थाटात जीवन जगतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

इथे क्लिक करा