पालकांची अशी वागणूक मुलांना त्यांच्यापासून करेल दूर, तुम्ही चुकूनही असं करू नका!
Photo Credit; instagram
पालक या नात्याने, तुमचं तुमच्या मुलासोबतचं नातं किती घट्ट आहे हे खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून तुम्ही त्यांचं चांगलं पालनपोषण करू शकाल.
Photo Credit; instagram
अनेक वेळा आई-वडील आणि मुलांचे नाते फारच बिघडते. याला काही प्रमाणात पालकांच्या सवयी कारणीभूत आहेत.
Photo Credit; instagram
मुलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हळूहळू पालक आणि त्यांच्यात भिंत उभी राहते.
Photo Credit; instagram
मुलांना टोमणे मारणे, इतर मुलांची प्रशंसा करणे आणि वाईट शब्द वापरणे यामुळे मुलं हळूहळू त्यांच्या पालकांपासून विभक्त होऊ लागतात.
Photo Credit; instagram
छोट्या-छोट्या गोष्टींसाठी त्यांना मारहाण करणे, शिक्षा करणे यामुळेही मुलांच्या मनात हळूहळू भीती निर्माण होते आणि भावनिकदृष्ट्या ते दूर जाऊ लागतात.
Photo Credit; instagram
वेगवेगळ्या प्रकारचे नियम बनवणे आणि प्रत्येक वेळी मुलांना शिक्षा करणे यामुळेही त्यांच्या मनात भीती निर्माण होते.
Photo Credit; instagram
मुलांवर जास्त नियंत्रण ठेवल्याने आणि त्यांचे खूप संरक्षण केल्याने मुले हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. गोष्टी लपवतात.
Photo Credit; instagram
अनेक वेळा मुलं आपल्या गोष्टी पालकांना मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात पण पालक त्या गोष्टी दुसऱ्याला सांगतात. असे केल्याने मुलाचे हृदय तुटू शकते आणि तो तुम्हाला त्याच्या भावना कधीही सांगणार नाही.
Photo Credit; instagram
अनेकवेळा आई-वडील शारीरिकदृष्ट्या मुलांसोबत असतात पण मानसिकदृष्ट्या दुसरीकडे कुठेतरी गायब होतात. त्याचा मुलांवर वाईट परिणाम होतो.
Pregnancy शब्द ऐकताच 'या' देशातील महिलांचा का उडतो थरकाप?