Photo Credit; instagram

बघा केलं की जमतं! 30 वर्षाची महिला होती प्रचंड लठ्ठ, 118 किलोवरून थेट...

Photo Credit; instagram

एका सामान्य महिलेने असं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे की, तिचे जुने फोटो पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही.

Photo Credit; instagram

पूर्वी या महिलेचे वजन 118 किलो होते पण आता तिचे वजन 61 किलो झाले असून तिने तब्बल 57 किलो वजन घटवले आहे.

Photo Credit; instagram

एवढं वजन कमी करणाऱ्या या महिलेचं नाव दीपिका राजपुरोहित असून ती 30 वर्षांची आहे. तिला एक मुलगाही आहे.

Photo Credit; instagram

लग्नानंतर दीपिकाचे वजन 86 किलो होते पण, प्रेग्नेसीनंतर तिचे वजन तब्बल 118 किलो झाले. तिला तिच्या मुलासोबत खेळताही यायचं नाही. 

Photo Credit; instagram

PCOD सारख्या समस्याही दीपिकाला उद्भवल्या. त्यानंतर तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

ट्रेनरच्या सल्ल्यानुसार, दीपिकाने तिच्या डाएटमध्ये बदल केले. तिने साखरयुक्त पदार्थ पूर्णपणे खाणे टाळले. त्याऐवजी ती दिवसातून चार चमचे तूप घ्यायची.

Photo Credit; instagram

दीपिकाने व्हे प्रोटीन घेतले. त्याचबरोबर शाकाहारी असल्यामुळे तिने सोया चंक्स, पनीर, डाळी यांचा डाएटमध्ये समावेश केला. 

Photo Credit; instagram

सकाळी रिकाम्यापोटी ती एक ग्लास गरम लिंबू पाणी घेते. त्यानंतर भाज्यांसह बनवलेले पनीरचे ती नाश्त्याला सेवन करते.

Photo Credit; instagram

जेवणात दीपिका डाळ, भात, दही, सलाड आणि चपाती घेते. तर, स्नॅक्स टाइमध्ये फळं, ड्रायफ्रूट खाते. त्याचबरोबर रात्रीच्या जेवणात भात, डाळ, सलाड आणि दही घेते.

Photo Credit; instagram

वर्कआउट रूटीनमध्ये ती दररोज दोन तास जीम करते. यामध्ये डंबल प्रेस, पुशअप्स, स्क्वॅट्स हे सर्व ती दररोज करते. 

पुढील वेब स्टोरी

मैत्री असावी तर अशी! नाहीतर गुलीगत धोका

इथे क्लिक करा