दारुची झिंग उतरणारच नाही, एका शॉटची किंमत 2.5 लाख, Whiskey ची खासियत माहितीय का?
Photo Credit; instagram
जगभरात बऱ्याच महागड्या दारूचे ब्रॅंड्स तुम्हाला माहित असतील. मात्र, 2.5 लाख रुपये एका शॉटची किंमत असलेल्या व्हिस्कीबद्दल तुम्हाला माहितीये?
Photo Credit; instagram
'या' खास प्रकारच्या दारूच्या ब्रॅंडबद्दल जाणून घ्या आणि पाहा, इतकं काय आहे यात?
Photo Credit; instagram
नुकतीच, जगभरातील सर्वात जुन्या मान्यताप्राप्त व्हिस्की डिस्टिलरी बुशमिल्सने आपल्या मर्यादित अॅडिशनमधील 46 वर्ष जुनी व्हिस्की रिलीज केली आहे.
Photo Credit; instagram
ही खास व्हिस्की म्हणजे 'बुशमिल्स 46 -इयर - द सिक्रेट्स ऑफ द रिव्हर बुश'. ही आतापर्यंतची सर्वात जुनी आयर्लंड सिंगल माल्ट व्हिस्की असल्याचे मानले जाते.
Photo Credit; instagram
ही जगातील सर्वात जुनी मान्यताप्राप्त डिस्टिलरी बुशमिल्स यांनी तयार केली आहे. ही मर्यादित आवृत्तीची व्हिस्की असून 46 वर्षांपासून साठवून ती तयार करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
ही व्हिस्की रिलीज होण्यापूर्वी मागील विक्रम 45 वर्षे जुन्या सिंगल माल्ट व्हिस्कीचा होता. म्हणून, बुशमिल्सने हा विक्रम मोडण्यासाठी 46 वर्षांनंतर ती लाँच केली.
Photo Credit; instagram
याच्या फक्त 300 बाटल्या बनवल्या गेल्या आणि सर्व बाटल्या विकल्या गेल्या आहेत. एका बाटलीची किंमत 12,500 डॉलर (सुमारे १० लाख रुपये) इतकी आहे.
Photo Credit; instagram
अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरातील 'फिफ्थ अव्हेन्यूच्या पेनिन्सुला' हॉटेलच्या मेनूमध्ये या व्हिस्कीचा समावेश करण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
या हॉटेलमध्ये तुम्हाला हवे असल्यास याचा एक शॉट ऑर्डर करू शकता ज्याची किंमत जवळपास 2.5 लाख रुपये आहे.