छत्रपती शिवरायांची झक्कास प्रतिकृती! दीड हजार दिव्यांची प्रकाशमय मानवंंदना
Photo Credit; instagram
यंदाच्या दिवाळीची सुरुवात कल्याणकरांसाठी अत्यंत भारावलेली अशी झाल्याचे दिसून आले.
Photo Credit; instagram
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यातर्फे भगवा तलाव परिसरात आयोजित दिपोत्सव सोहळ्याचे यावेळी तब्बल 1 हजार 500 दिव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती हे दिपोत्सवाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
Photo Credit; instagram
कल्याण शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे.
Photo Credit; instagram
या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला.
Photo Credit; instagram
या दिपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 1 हजार 500 दिव्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची 10×10 फुटांची भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आली.
Photo Credit; instagram
त्यासोबत भगवा तलाव परिसरातही उपस्थित मान्यवर आणि कल्याणकर नागरिकांच्या हस्ते या तलाव परिसरात 1 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले.
Photo Credit; instagram
हा दिपोत्सव डोळ्यात साठवण्यासाठी आणि याचा साक्षीदार होण्यासाठी शिवप्रेमी आणि कल्याणकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Weight Loss साठी हे साऊथ इंडियन पदार्थ खाल तर लगेच व्हाल सडपातळ!