Photo Credit; GettyImages

तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार

Photo Credit; प्रातिनिधिक फोटो

बँकेच्या नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 13000 हून अधिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

Photo Credit; प्रातिनिधिक फोटो

SBI कनिष्ठ लिपिक भर्ती 2024 मोहिमेद्वारे एकूण 13735 रिक्त जागा भरल्या जातील.

Photo Credit; प्रातिनिधिक फोटो

अर्ज प्रक्रिया 17 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे, जी 07 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.

Photo Credit; प्रातिनिधिक फोटो

प्राथमिक भरती परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये आणि मुख्य परीक्षा मार्च किंवा एप्रिल 2025 मध्ये होईल.

Photo Credit; प्रातिनिधिक फोटो

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.

Photo Credit; प्रातिनिधिक फोटो

पात्र अर्जदारांचे वय 1 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

Photo Credit; प्रातिनिधिक फोटो

कनिष्ठ सहयोगी लिपिक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांचे प्रारंभिक मूळ वेतन 26730 रुपये असेल ज्यामध्ये दोन आगाऊ वेतनवाढ समाविष्ट आहे. अधिसूचनेत वार्षिक वेतन वाढीचा तपशील पहा.

Photo Credit; प्रातिनिधिक फोटो

सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC/ST/PH श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

Photo Credit; प्रातिनिधिक फोटो

इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

पुढील वेब स्टोरी

रम आणि बिअर एकत्र घेतली की तुमचा विषयच...

इथे क्लिक करा