Dhule : कंटेनरने अक्षरशः चिरडले! 10-15 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Photo Credit; instagram
एकीकडे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ भीषण अपघात घडलेला असतानाच पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे.
Photo Credit; instagram
धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या पलासनेर गावाजवळील बस स्थानकाबाहेर ही गंभीर घटना घडली.
Photo Credit; instagram
याठिकाणी उभ्या असलेल्या तीन वाहनांवर समोरून येणारा 14 चाकी कंटेनर धडकल्यामुळे हा भीषण अपघात झाला.
Photo Credit; instagram
या अपघातात 10 ते 12 जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसंच, मृतांचा आकाडा वाढण्याचीही शक्यता आहे.
Photo Credit; instagram
इतर काहीजण अपघातात गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शिरपूर आणि धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं.
Photo Credit; instagram
यादरम्यान अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Photo Credit; instagram
याठिकाणी बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. अपघातात लहान मुलांचाही समावेश आहे.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचं बोललं जातंय. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तीनही वाहनांचा अक्षरशः चुराडा झालाय.