सुषमा अंधारे रडल्या म्हणाल्या, 'भाऊ म्हटलं तरी का झोंबतं?'
मुंबई Tak च्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंनी सूचक वक्तव्य करत टीकास्त्रही सोडले.
सुषमा अंधारे आणि भाजप नेत्या दिव्या ढोले या एकाच मंचावर होत्या.
यावेळी सुषमा अंधारेंना संजय शिरसाटांनी त्यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर अश्रू अनावर झाले.
काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे सरकार) आमदार संजय शिरसाट यांनी, 'ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ . काय काय लफडे केले तिने काय माहीत नाही', असं विधान केलं होतं.
त्यांच्या या विधानावर बोलताना सुषमा अंधारेंचे डोळे पाणावले.
सुषमा अंधारे म्हणाल्या, 'तुम्ही चहाला गेल्यावर लोकांना खटकलं. मी तर दादा भाऊ म्हटल्यावर लोकांना झोंबतं.'
'संजय शिरसाट यांना भाऊ म्हटलं तर का राग येतो? आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले तेव्हा त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की, भाऊ मी सुषमा अंधारे.'
'या सगळ्यात वाईट कशाचं वाटतंय, घाबरून का जाते, तर माझी लेक सहा वर्षांची आहे. तिला फार काही कळणार नाही.'
'जेव्हा माझी लेक मोठी होईल.' असं म्हणत सुषमा अंधारेंचा कंठ दाटून आला.
मुंबई Tak बैठक: क्रिकेटर ऋतुराज गायकवाडच्या प्रश्नावर अभिनेत्री सायली संजीवचं थेट उत्तर...