'या' गोष्टीमुळे तुमच्या घरात लक्ष्मी येईल धावत ...
मानवी सुख, समृद्धी आणि माणसाच्या कल्याणासाठी वास्तुशास्त्रात चार दिशांचे महत्त्व प्रचंड असल्याचे सांगितले आहे.
वास्तुशास्त्रात घराच्या दक्षिण दिशेबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्या जर समजून घेतल्या तर श्रीमंती नक्कीच धावत येणारी आहे.
वास्तुशास्त्रात घराच्या दक्षिण दिशेला झाडू ठेवणे शुभ मानले जाते. कारण झाडूमध्ये धनाची देवी लक्ष्मी वास करते असं सांगितले जाते. घरात दक्षिण दिशेला झाडू ठेवल्यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
झाडू नेहमी दक्षिण दिशेला लपवून ठेवावा. घरातील झाडू कधीही उत्तर अथवा पूर्व दिशेला ठेऊ नये.
त्याच बरोबर घरातील पलंगाचे वरची बाजून ही दक्षिण दिशेलाच करावी. पलंग असा ठेववा की, पलंगावर झोपल्यानंतर तुमचे डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असावे.
दक्षिणेकडे डोके ठेवून झोपल्याने मनात चांगले विचार येतात असंही सांगितले जाते. त्यामुळे अशी लोकं नेहमीच यशाच्या बाबतीत पुढं जाणारे असतात.
घरातील सर्व मौल्यवान वस्तूही दक्षिण दिशेलाच ठेवाव्यात. कारण मौल्यवान वस्तू दक्षिण बाजूला ठेवल्या तरी घरही सुखी राहते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला पक्ष्याचे चित्र लावल्यास तेही शुभ मानले जात असते. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जाही येत नाही.
Weight Loss : पोटाचा घेर कमी करायचाय?, ‘हे’ पदार्थ खायला सुरुवात करा