Photo Credit; instagram

Arrow

ज्या रस्त्यांवरून कचरा उचलला तिथेच आज 20 कोटींचं घर! क्रिकेटपटूची प्रेरणादायी कहाणी

Photo Credit; instagram

Arrow

भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह अनेक देशांमध्ये स्फोटक क्रिकेट खेळले जाते, परंतु कॅरिबियनमध्ये खेळल्या जाणार्‍या स्फोटक आणि बेफिकीर शैलीची तुलना करता येत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या 20 वर्षांतील या बेफिकीर-विध्वंसक कॅरेबियन क्रिकेटची सर्वात मोठी ओळख म्हणजे महान फलंदाज ख्रिस गेल, जो 21 सप्टेंबर रोजी 44 वर्षांचा झाला.

Photo Credit; instagram

Arrow

संपूर्ण क्रिकेट जग गेलला त्याच्या स्फोटक फलंदाजी आणि लांब षटकार मारण्यासाठी ओळखते. पण आज तो इथपर्यंत अगदी बेताच्या परिस्थितीतून पोहोचला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत गेलने सांगितले की, अत्यंत गरिबीमुळे त्याला कचरा गोळा करून आपला उदरनिर्वाह करावा लागला. त्याच्या आई-वडिलांनी साधी नोकरी करून कुटुंबाचा भार उचलला. त्यानंतर क्रिकेटने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच्या हातात बॅट आल्यावर त्याने आपली आणि आपल्या कुटुंबाची अवस्था तर बदललीच, पण बॅटिंगमध्येही बदल केला. विशेषत: गेलने टी-20 फलंदाजीत क्रांती आणली.

Photo Credit; instagram

Arrow

क्रिकेटमधील त्याच्या आश्चर्यकारक प्रभावामुळे, गेल आज चांगली लाइफस्टाइल जगतो. जमैकामध्ये किंग्स्टनच्या ज्या रस्त्यांवरून तो कचरा उचलायचा तिथेच त्याचं 20 कोटींची घर आणि अनेक गाड्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास 20 हजार धावा करणाऱ्या ख्रिस गेलने केवळ आयपीएलसह जगातील विविध T20 स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला नाही तर, त्याने वेस्ट इंडिजला दोनदा 2012, 2016 विश्वविजेतेपदही मिळवून दिले.

Smallest Hill Station : महाराष्ट्रातलं 'हे' हिल स्टेशन, स्वर्गाहूनही सुंदर!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा