Photo Credit; Getty, AFP, PTI, AP, Social Media

'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान

Photo Credit; Getty, AFP, PTI, AP, Social Media

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी सतत चर्चेत असतो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Photo Credit; Getty, AFP, PTI, AP, Social Media

कांबळीला लघवी करताना त्रास होत असल्याची तक्रार होती. तथापि, तो बरा झाला आहे आणि 1 डिसेंबर रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Photo Credit; Getty, AFP, PTI, AP, Social Media

कांबळीची आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नाही. त्याची तब्येतही खराब आहे. त्याला नीट चालता येत नाही. त्याला आधाराची गरज लागते.

Photo Credit; Getty, AFP, PTI, AP, Social Media

कांबळीने दोनदा लग्न केले आहे. त्याने पहिले लग्न 1998 मध्ये नोएला लुईसशी केले, जी पुण्यातील हॉटेल ब्लू डायमंडमध्ये रिसेप्शनिस्ट होती. नंतर त्याने तिच्यापासून घटस्फोट घेतला.

Photo Credit; Getty, AFP, PTI, AP, Social Media

यानंतर कांबळीने मॉडेल अँड्रिया हेविटशी लग्न केले. कांबळी याला एक मुलगा जिझस क्रिस्टियानो कांबळी आणि एक मुलगी आहे.

Photo Credit; Getty, AFP, PTI, AP, Social Media

सूर्यांशी पांडेच्या पॉडकास्टमध्ये कांबळीची पत्नी अँड्रिया मोकळेपणाने बोलली. यावेळी पती कांबळी, त्यांचा मुलगा आणि मुलगी देखील उपस्थित होते.

Photo Credit; Getty, AFP, PTI, AP, Social Media

कांबळीपासून वेगळे होण्याच्या प्रश्नावर अँड्रिया म्हणाली की, जर मी त्याला सोडले तर त्याची काळजी कोण घेईल? त्याची काळजी घेण्यासाठी कोणीही नसेल.

Photo Credit; Getty, AFP, PTI, AP, Social Media

कांबळीपासून वेगळे होण्याच्या प्रश्नावर अँड्रिया म्हणाली - एकदा असा विचार आला होता (अँड्रियाने 2023 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता पण नंतर तो मागे घेतला).

Photo Credit; Getty, AFP, PTI, AP, Social Media

'मी तेव्हा त्याला सोडून गेले होतो पण तो कसा आहे, त्याने नीट जेवण केलं की नाही, तो बेडवर आरामात झोपू शकला आहे की नाही हे नेहमीच माझ्या मनात असायचं...'

Photo Credit; Getty, AFP, PTI, AP, Social Media

52 वर्षीय कांबळीच्या बाबतीत अँड्रिया पुढे म्हणाली, "मी परत आले तेव्हा त्याची अवस्था पाहून मला समजले की, त्याला माझी गरज आहे."

Photo Credit; Getty, AFP, PTI, AP, Social Media

कांबळीने 1991 मध्ये टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तर त्याने 2000 मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला होता. 2009 मध्ये कांबळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलेलं.

Photo Credit; Getty, AFP, PTI, AP, Social Media

कांबळीने 17 कसोटी आणि 104 वनडे सामने खेळले. त्याने कसोटी सामन्यांमध्ये 1084 धावा केल्या. तर त्याने वनडे सामन्यात 2477 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने दोन शतके आणि 14 अर्धशतके झळकावली.

पुढील वेब स्टोरी

'या' मुलीने फक्त २ गोष्टी खायच्या केल्य बंद अन् ५० किलो वजन...

इथे क्लिक करा