Photo Credit; instagram

Arrow

KL Rahul अनफिट असतानाही टीममध्ये, रोहित-आगरकरवर प्रश्न...

Photo Credit; instagram

Arrow

आशिया कप 2023 साठी टीम इंडियाच्या 17 सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे. संजू सॅमसनचा संघात राखीव म्हणून समावेश झाला. 

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचे १७ सदस्यीय संघात पुनरागमन झाले. 

Photo Credit; instagram

Arrow

1 मे 2023 रोजी IPL सामन्यात जखमी झालेला केएल राहुल देखील कोणताही सामना न खेळता टीम इंडियात परतला आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

केएल राहुल दुखापतीनंतर एकही सामना खेळला नाही हा मोठा प्रश्न आहे आणि त्याला थेट संघात प्रवेश मिळाला आहे. असाच काहीसा प्रकार श्रेयस अय्यरच्या बाबतीत घडलाय.

Photo Credit; instagram

Arrow

21 ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी राहुल निगल दुखापतीने त्रस्त असल्याचं मान्य केलं.

Photo Credit; instagram

Arrow

अजित आगरकरने तर दुखापतीमुळे केएल राहुल 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकणार नाही याचीही पुष्टी केली. 

Photo Credit; instagram

Arrow

श्रेयस अय्यर आता पूर्णपणे बरा झाल्याचे आगरकर यांनी परिषदेत सांगितलं. त्याचबरोबर केएल राहुलच्या नव्या दुखापतीचा जुन्या दुखापतीशी संबंध नसल्याचंही सांगितलं. 

Photo Credit; instagram

Arrow

इशान किशन, केएल राहुल यांच्यानंतर बॅकअप म्हणून संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला आहे, असे अजित आगरकर यांनी सांगितलं. 

Photo Credit; instagram

Arrow

आशिया चषक स्पर्धेतील दुसरा किंवा तिसरा सामना तो खेळू शकतो, अशी अपेक्षा केएल राहुलबाबत व्यक्त केली जात आहे. आगरकर म्हणाले की, 'श्रेयस आणि राहुल आमच्यासाठी खास खेळाडू आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान आगरकर म्हणाले की, 'विश्वचषकासाठी भारतीय संघाचा संघ 5 सप्टेंबरपूर्वी जाहीर केला जाणार नाही.' 

पांढऱ्या साखरेतील आणि ब्राउन शुगरमधील नेमका फरक काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा