Photo Credit; instagram

Arrow

ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर!

Photo Credit; instagram

Arrow

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अहमदाबाद येथे होणाऱ्या या ओपनिंग सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला. कर्णधार केन विल्यमसन पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.

Photo Credit; instagram

Arrow

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) ही माहिती दिली. ट्वीटरवर लिहिलं, 'विलियमसन इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषकातील सुरुवातीच्या सामन्याला मुकणार आहे. तो गुडघ्यावरील उपचार घेत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करेल.

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात विल्यमसन फक्त फलंदाज म्हणून खेळेल, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

विल्यमसनला IPL 2023 दरम्यान दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. 

Photo Credit; instagram

Arrow

विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघात केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग आहेत.

iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा