Photo Credit; instagram

महिलांच्या पीरियड्सबाबत पुरुषांना 'या' गोष्टी माहितीच हव्या, नाहीतर...

Photo Credit; instagram

बरेच जण असा विचार करतात की, मासिक पाळी म्हणजेच पीरियड्स हा फक्त महिलांचा विषय आहे. पण तसं नाहीये.

Photo Credit; instagram

पीरियड्सशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या पुरुषांना माहित असणं अत्यंत आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

पीरियड्स येणे नैसर्गिक आहे, म्हणून, त्याबद्दल खुली चर्चा केल्याने त्याभोवती असलेले बंधन तोडण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

पीरियड्सच्या काळात महिलांना भावनिक चढ-उतारांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांना सहानुभूती देणे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

Photo Credit; instagram

पीरियड्स दरम्यान महिलांना पेटके, डोकेदुखी आणि थकवा अशा समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पुरुषांनी त्यांच्या शारीरिक समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे.

Photo Credit; instagram

पीरियड्स दरम्यान हार्मोनल चढउतारांमुळे महिलांना चिडचिडेपणा किंवा मूड स्वींग्स होऊ शकतात, त्यामुळे त्यांना आधार द्या.

Photo Credit; instagram

स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीत आराम करण्यास प्रोत्साहित करा. हे त्यांना वेदना आणि थकवा दूर करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

पीरियड्सबाबत प्रत्येक स्त्रीचा अनुभव वेगळा असतो. काहींना जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो, काहींना कमी रक्तस्राव होऊ शकतो. 

Photo Credit; instagram

पीरियड्स दरम्यान पुरूषांनी महिलांना अनावश्यक सल्ले देणे टाळत त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. 

Photo Credit; instagram

महिलांसाठी पीरियड्स थकवा आणणारे असतात. त्यामुळे पुरूषांनी त्यांना घरातील कामात मदत करावी. 

Photo Credit; instagram

गरज पडल्यास पुरूषांनी पार्टनरसाठी सॅनिटरी उत्पादने खरेदी करावीत.

Photo Credit; instagram

पुरुषांनी हे समजून घेतले पाहिजे की पीरियड्स हा संवेदनशील काळ असतो. दयाळूपणा दाखवा, टीका करू नका आणि त्यांच्या मनःस्थितीची किंवा परिस्थितीची चेष्टा करू नका.

पुढील वेब स्टोरी

तुम्ही पण पायात बांधता काळा धागा? करेक्ट कार्यक्रमच होईल बरं!

इथे क्लिक करा