G20 परिषदेत AI ची कमाल, विदेशी पाहुण्यांच्या स्वागतावेळी होणार धमाल!
Photo Credit; instagram
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आगामी G20 परिषदेदत Bharat: The Mother of Democracy या नावाच्या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे.
Photo Credit; instagram
हे प्रदर्शन भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटना (ITPO) येथे ८ ते १० सप्टेंबर दरम्यान G20 शिष्टमंडळासाठी उघडलं जाईल.
Photo Credit; instagram
या प्रदर्शनात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी एआय अवतार तयार करण्यात आला आहे, जो या प्रदर्शनाची थोडक्यात ओळख करून देईल.
Photo Credit; instagram
हा एआय अवतार लोकशाहीचा इतिहास आणि व्यवस्थाही सांगेल. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ब्रॉंझची प्रतिकृती असेल. १२० किलो वजनाच्या या प्रतिकृतीची उंची ५ फूट आहे.
Photo Credit; instagram
हा AI अवतार हॉलच्या मध्यभागी एका उंच पोडियमवर सेट केला आहे.
Photo Credit; instagram
AI अवतारासह १०.५ सेमी स्क्रीन देखील आहे, जी लोकांशी संवाद साधण्यास मदत करेल. हा अवतार १६ परदेशी भाषांना सपोर्ट करेल.
Photo Credit; instagram
भारतीय संस्कृतीची माहिती देणारा भव्य स्क्रीनही प्रदर्शनात लावण्यात येणार आहे. त्यात भारतीय संस्कृतीचे व्हिडीओ दाखवले जातील.
Photo Credit; instagram
या प्रदर्शनादरम्यान भारतीय लोकशाहीचे विविध पैलू दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये स्वातंत्र्य, समता इत्यादींचे महत्त्व सांगितले जाईल.
Photo Credit; instagram
भारतीय समाजात लोकशाही कशी कार्य करते हे सांगणे हा या प्रदर्शनाच्या आयोजनाचा उद्देश आहे.
Malaika चा 11 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, 'ती' पोस्ट का होतेय व्हायरल?