Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनासाठी राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाची खास थीम!
Photo Credit; instagram
२६ जानेवारी या भारताच्या प्रजासत्ताकदिनी नवी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली 'राजपथा'वरून एक मोठी मिरवणूक निघते.
Photo Credit; instagram
भारतातील विविध राज्यांचे, तसेच विविध मंत्रालयांचे आपापली संस्कृती दर्शविणारे चित्ररथ या मिरवणुकीत सामील होतात.
Photo Credit; instagram
यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी ‘विकसित भारत’ व ‘भारत लोकशाहीची जननी’ अशा दोन संकल्पना सांगण्यात आल्या आहेत.
Photo Credit; instagram
त्यानुसार महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त, ‘लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर चित्ररथाचे सादरीकरण केले आहे.
Photo Credit; instagram
प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी केंद्र सरकारकडून 26 राज्ये व सात केंद्रशासित प्रदेश यांना एक थीम सांगितली जाते.
Photo Credit; instagram
यावर्षी, भारत देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये 16 चित्ररथ पाहता आले आहेत.
Weight Loss: ऑफिसमुळे व्यायामासाठी वेळच मिळत नाही? 'या' आहेत सोप्या टिप्स!