Photo Credit; instagram

Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?

Photo Credit; instagram

गणपती बाप्पाच्या पुजेमध्ये दुर्वांना विशेष असे महत्व आहे.

Photo Credit; instagram

दुर्वा गणपती बाप्पाला फारच प्रिय आहेत. त्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा अपूर्ण मानली जाते.

Photo Credit; instagram

गणपती बाप्पाला पुजेमध्ये 21 दुर्वांची जुडी अर्पण केली जाते.

Photo Credit; instagram

गणपती बाप्पाच्या पुजेमध्ये दुर्वा नेमकी का वापरली जाते? याविषयी आज जाणून घेऊयात...

Photo Credit; instagram

पौराणिक कथेनुसार, अनलासूर नावाचा एका दैत्याने सगळीकडे उच्छाद मांडला होता.

Photo Credit; instagram

कोणीही काही केल्या या दैत्याचा वध करु शकत नव्हतं.

Photo Credit; instagram

अनलासुराच्या छळाला त्रस्त होऊन सर्व देव गण हे अखेर गणपती बाप्पाकडे गेले.

Photo Credit; instagram

तेव्हा गणपती बाप्पाने अनलासुराचा थेट गिळून वध केला.

Photo Credit; instagram

असं म्हटलं जातं की, अनलासुराला गिळून बाप्पाने त्याचा वध केला पण त्यानंतर बाप्पाच्या उदरात जळजळ होऊ लागली.

Photo Credit; instagram

हीच जळजळ शांत करण्यासाठी ऋषी-मुनींनी बाप्पाला दुर्वा खाण्यास दिल्या.

Photo Credit; instagram

तेव्हापासूनच गणपती बाप्पाला दुर्वा फारच प्रिय समजली जाऊ लागली आणि पुजेमध्ये त्याचा वापर होऊ लागला.

Photo Credit; instagram

लक्षात, असू द्या की, पुजेसाठी जर आपण दुर्वा घेत असाल तर त्या स्वच्छ जागेतून घ्याव्या.

Photo Credit; instagram

त्यामुळे बाप्पाच्या पुजेसाठी दुर्वा आणायला अजिबात विसरु नका.

पुढील वेब स्टोरी

करोडो रूपयांच्या मालकीण बनतात 'या' जन्म तारखेच्या मुली! अचानक...

इथे क्लिक करा