Photo Credit; instagram

पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला कोणता बरं?

Photo Credit; instagram

गणरायाच्या आगमनास आता काही तासच उरले आहेत. सर्व भक्तांना कधी एकदा गणेशोत्सव सुरू होतोय, अशी आतुरता लागून राहिली आहे. 

Photo Credit; instagram

गणेशोत्सवादरम्यान पुण्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होते.

Photo Credit; instagram

गणेशोत्सवाचे स्वरूप काळानुसार कितीही बदलले असले तरी पुण्यातील मानाच्या गणपतींचे महत्त्व आजही कायम आहे. 

Photo Credit; instagram

चला तर मग पुण्यातील मानाच्या या पाच गणपतींविषयी जाणून घेऊयात…

Photo Credit; instagram

पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे. शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत कसबा पेठ येथे कसबा गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे.

Photo Credit; instagram

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती.तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दुसरी ग्रामदेवता मानली जाते आणि याच मंदिराच्या परिसरात गणपतीची ही मूर्ती असल्याने देवीच्या नावाने हा गणपती ओळखला जातो. 

Photo Credit; instagram

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती.

Photo Credit; instagram

पुण्याचा मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती. हा गणपती त्याच्या उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो.

Photo Credit; instagram

पुण्यातला शेवटचा व पाचवा मानाचा गणपती म्हणून जो ओळखला जातो, तो म्हणजे केसरी वाडा गणपती. १८९४ पासून केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेने हा गणेशोत्सव सुरू केला.

पुढील वेब स्टोरी

बाईईई... खरंच की काय? लव्ह बाईटमुळे डायरेक्ट जातो जीव?

इथे क्लिक करा