Photo Credit; instagram

तुम्ही कार्बाईडने पिकवलेले  आंबे खाताय?

Photo Credit; instagram

कार्बाइडने पिकवलेले आंबे बाजारात विकले जात आहेत, त्यांना अशा प्रकारे ओळखा

Photo Credit; instagram

आंब्यांचा सिझन सुरूय. बाजारात सगळीकडे आंबे दिसताय, पण लक्षात ठेवा की प्रत्येक आंबा नैसर्गिकरित्या पिकत नाही.

Photo Credit; instagram

काही आंबे कार्बाइडने पिकवले जातात. असे आंबे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. ते आंबे कसे ओळखायचे, पाहू...

Photo Credit; instagram

कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेले आंबे चमकदार दिसतात आणि लवकर पिकतात. पण त्याने कर्करोगही होऊ शकतो.

Photo Credit; instagram

FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने फळं पिकवण्यासाठी फक्त इथिलीन वायू सुरक्षित मानला आहे.

Photo Credit; instagram

फळ पिकवण्यासाठी कार्बाइडचा वापर करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. तरीही काही लोक तो वापरतात.

Photo Credit; instagram

इथिलीन वायू फळं लवकर, सुरक्षितपणे पिकवतो. कॅल्शियम कार्बाइडमध्ये विषारी आणि हानिकारक घटक असतात.

Photo Credit; instagram

कार्बाइडने पिकवलेले आंब्यांमुळे चक्कर , घसा खवखवणे, उलट्या होणे,  त्वचेवर जखमा होणे यासारख्या समस्या उद्भवतात.

Photo Credit; instagram

फक्त विश्वासू दुकानदाराकडूनच आंबे खरेदी करा आणि घरी आणल्यानंतर, ते खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने चांगले धुवा.

Photo Credit; instagram

चांगले आंबे खाल्ले तरच आंब्याची खरी चव आणि आरोग्यदायी फायदे अनुभवू शकता.

पुढील वेब स्टोरी

काही केल्या वजन कमी होत नाहीये? मग, 'या' 7 भाज्या ठरतील फायदेशीर

इथे क्लिक करा