Photo Credit; instagram

IAS पल्लवीची कहाणी ऐकून तुम्हीही म्हणाल, मॅडम तुमचा विषय लय हार्डए...

Photo Credit; instagram

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत ज्यांनी कठोर परिश्रम घेऊन यश मिळवलं आहे त्यांची कहाणी आणखीनच प्रेरणादायी ठरते. IAS पल्लवी वर्मा यांची स्टोरीही अशीच आहे.

Photo Credit; instagram

पल्लवी वर्मा यांनी 2020 मध्ये UPSC ऑल इंडिया रँक 340 मिळवला होता. पल्लवीला हे यश दुसऱ्या-तिसऱ्या प्रयत्नान नाही तर 7व्या प्रयत्नात मिळालं.

Photo Credit; instagram

पहिल्या ते सहाव्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतरही पल्लवी यांची हिंमत संपली नाही आणि त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले कारण त्यांचा स्वतःवर विश्वास होता.

Photo Credit; instagram

यातून हेच समजतं की, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल आणि पूर्ण मेहनत घेऊन तुम्ही तयारी केली तर यश नक्कीच मिळतं.

Photo Credit; instagram

इंदूरची रहिवासी असलेल्या पल्लवी यांनी शालेय शिक्षण इंदूरमधून केले आणि त्यानंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केले. 

Photo Credit; instagram

पदवीनंतर, पल्लवी यांनी चेन्नईमध्ये सॉफ्टवेअर परीक्षक म्हणून एक वर्षापेक्षा कमी काळ काम केले आणि 2013 नंतर त्यांनी स्वत:ला नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी पूर्णपणे झोकून दिले.

Photo Credit; instagram

त्यांनी 2013 ते 2020 या कालावधीत यूपीएससीची परीक्षा दिली. त्या प्रिलिम्समध्ये 3 वेळा नापास झाल्या, एकदा मेनमध्ये नापास झाल्या आणि 2 वेळा मुलाखतीला पोहोचल्यानंतरही त्यांना यश मिळाले नाही.

Photo Credit; instagram

आपल्या 7व्या प्रयत्नात त्यांनी अखिल भारतीय 340 वा रँक मिळवून आपले स्वप्न पूर्ण केले.

Photo Credit; instagram

2020 मध्ये पल्लवी यांच्या आईला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले होते, त्या काळात पल्लवी आईची काळजी घेत अभ्यासही करत होत्या.

पुढील वेब स्टोरी

लग्नाआधीच मुलांचं प्लॅनिंग, 22 वर्षाच्या तरूणीची भलतीच अट!

इथे क्लिक करा