नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश
Photo Credit; instagram
पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवानमधून एक आश्चर्यकारक घटना घडली. जिथे एक रोजंदारी मजूर काही तासात करोडपती झाला.
Photo Credit; instagram
हा मजूर शेळ्यांसाठी गवत कापण्यासाठी गेला होता आणि घरी परतल्यावर त्याला कळले की तो आता करोडपती झाला आहे. ही बातमी गावात पसरताच जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
Photo Credit; instagram
जिल्ह्यातील मंगळकोटमधील खुर्तुबापूर गावात ही घटना घडली. येथे राहणारे भास्कर माळी हे इतरांच्या शेतात मजुरी करून शेळ्या पाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
Photo Credit; instagram
मजूर भास्कर माळी यांनी सांगितलं, 'रविवारी ते नपारा बसस्थानकावर बकऱ्यांना गवत कापण्यासाठी आले होते. पण लॉटरीचे तिकीट घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते.'
Photo Credit; instagram
त्यांनी ओळखीच्या कोणाकडून 40 रुपये उसने घेतले, नंतर मामेझुल भाईच्या लॉटरी काउंटरवरून 60 रुपयांना तिकीट क्रमांक 95H83529 विकत घेतले आणि घरचे काम करू लागले.
Photo Credit; instagram
दुपारी त्यांना लॉटरीत पहिले बक्षीस मिळाल्याचे समजले. हे कळल्यावर त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही.
Photo Credit; instagram
लॉटरीचे तिकीट विक्रेते मौलिक शेख मामेझुल यांनी सांगितले, रविवारी दुपारी 1.20 वाजता त्यांना कळले की गावातील भास्कर माळी यांनी 1 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले आहे.
Photo Credit; instagram
त्यांचे घर मातीचे असल्याचे मजूर भास्कर माळी यांनी सांगितले. पावसाळ्यात पाणी टपकते. या पैशातून आम्ही घर बांधू आणि आमच्या मुलींच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडू.
Photo Credit; instagram
भास्कर यांच्या मुलींनी सांगितलं, वडिलांनी मोठ्या कष्टाने आम्हाला बीए पास केले आणि कर्ज काढून आमच्या दोन्ही बहिणींचे लग्न केले.
भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते?