Photo Credit; instagram

Weight Loss करताय, मग दिवसभरात किती चपात्या खायच्या?

Photo Credit; instagram

रोटी किंवा चपाती हा आपल्या जेवणाचा मुख्य भाग आहे परंतु गेल्या काही वर्षांपासून लोक ते खाणे टाळत आहेत कारण ते कार्बोहायड्रेट्सचे मुख्य स्त्रोत आहे.

Photo Credit; instagram

पण, लोकांना हे समजून घ्यावे लागेल की जर वजन कमी होत नसेल तर याला फक्त चपाती खाणं कारणीभूत नाही. 

Photo Credit; instagram

आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी खाल्ल्यानेही तुमचे वजन वाढते. तसंच, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसाल, पुरेशी झोप घेत नसाल, जीवनसत्त्व आणि खनिजांची कमतरता असेल, तर वजन वाढू शकते. 

Photo Credit; instagram

चपाती इतर पौष्टिक अन्नासोबत खाल्ल्यास फायबरचा चांगला स्रोत मिळतो. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे राहते.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्याच्या आहारात फायबर, जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या चपातीचा समावेश केल्यास वजन कमी होऊ शकते.

Photo Credit; instagram

साधारणपणे तूप किंवा तेल नसलेल्या चपातीत फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त नसते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. तसंच जीवनसत्त्व B1, B3, B5, B6, B9 आणि E असतात.

Photo Credit; instagram

तुम्ही दररोज किती चपाती खाऊ शकता हे तुम्हाला एकूण किती कॅलरीज खाव्या लागतील यावर अवलंबून असेल. मध्यम आकाराच्या चपातीत सुमारे ८१ कॅलरीज असतात. 

Photo Credit; instagram

जर तुम्हाला दुपारच्या जेवणात एकूण 300 कॅलरीज घ्यायच्या असतील तर तुम्ही 2 रोट्या घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला अंदाजे 162 कॅलरीज मिळतील. याशिवाय तेलात किंवा तुपात बनवलेल्या भाज्यांमध्येही कॅलरी असतात.

Photo Credit; instagram

नेहमी लक्षात ठेवा की फक्त चपातीच नाही तर तुम्ही खात असलेल्या डाळी आणि भाज्यांमध्येही काही प्रमाणात कार्ब्स असतात. 

Photo Credit; instagram

तुम्ही एकावेळी 2 पेक्षा जास्त चपाती खात असाल, तर तुम्ही डाळी, भाज्या, कोशिंबीर इत्यादींचा समावेश करून तुमच्या कॅलरीज दुपारच्या जेवणातील एकूण कॅलरीजपेक्षा जास्त तर नाहीत ना हे तपासावे.

पुढील वेब स्टोरी

Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!

इथे क्लिक करा