Valentine Day 2024: 14 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो व्हॅलेंटाईन डे?
Photo Credit; instagram
फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. अनेकजण याची आतुरतेने वाट पाहत असतात.
Photo Credit; instagram
14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे जगभरात साजरा केला जातो. पण याच दिवशी का? असा प्रश्न अनेकांना पडतो.
Photo Credit; instagram
व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात 7 फेब्रुवारीला रोझ डेने होते. या प्रेमाच्या दिवसांचा इतिहास आपण सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
१४ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन डेची सुरूवात रोमन राजा क्लॉडियसच्या काळात झाली. त्या काळी रोममध्ये सेंट व्हॅलेंटाइन नावाचा एक धर्मगुरूही होता.
Photo Credit; instagram
राजा क्लॉडियसचा असा विश्वास होता की प्रेम आणि विवाह पुरुषांच्या शक्तीचा नाश करतात.
Photo Credit; instagram
या विचारामुळे क्लॉडियसने आपल्या राज्यात एक आदेशही काढला की राज्यातील अधिकारी आणि सैनिक लग्न करू शकत नाहीत.
Photo Credit; instagram
पण त्याउलट सेंट व्हॅलेंटाईन नेहमीच जगात प्रेम वाढवण्याबद्दल बोलत असे. त्यांना राजाचा हा आदेश कळला तेव्हा त्यांनी विरोध केला.
Photo Credit; instagram
सेंट व्हॅलेंटाईन यांनी अनेक सैन्य अधिकारी आणि सैनिकांची लग्न करून दिली. जेव्हा राजाला हे कळले तेव्हा त्याने १४ फेब्रुवारी २६९ रोजी सेंट व्हॅलेंटाइनला फाशी दिली.
Photo Credit; instagram
सेंट व्हॅलेंटाईनच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याच्या बलिदानाचा सन्मान केला आणि स्मरणार्थ व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा निर्णय घेतला.