उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील लालगंज कोटवा येथील धधुआ गाजन गावात राहणाऱ्या एका कुटुंबावर सापाने कहर केला.
Photo Credit; instagram
17 सप्टेंबर 2023 रोजी सापाने 9 वर्षांचा आगम यादव आणि 7 वर्षांचा अर्णव या दोन भावांना चावा घेतला. शरीरात विष पसरल्याने दोघांचा मृत्यू झाला. यावेळी मुलांचे वडील दुसऱ्या शहरात होते. आईने नर-मादी सर्पाला पाहिलं होतं.
Photo Credit; instagram
20 सप्टेंबर रोजी सर्पाच्या या जोडीने मुलांचे वडील बबलू यांच्यावर हल्ला केला. मात्र, साप बबलूला चावू शकले नाहीत. पण, साप पाहिल्यानंतर बबलूची प्रकृती खालावली.
Photo Credit; instagram
या नर-मादी सर्पाच्या जोडीमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. मुलांचा मृत्यू आणि वडिलांची प्रकृती ढासळल्याने पीडित कुटुंबात शोककळा पसरली आहे.
Photo Credit; instagram
येथील स्थानिक सर्पमित्रांनी या सर्पाच्या जोडीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तीन दिवस साप पकडू शकले नाहीत.
Photo Credit; instagram
कानपूरहून बोलावलेल्या सर्पमित्रांनी अनेक तास सापांचा शोध घेतला.
Photo Credit; instagram
अथक परिश्रमानंतर सर्पमित्रांनी या सर्पाच्या जोडीला पकडलं आहे.
Photo Credit; instagram
या सर्पाच्या जोडीने एका कुटुंबाला उद्ध्वस्त केलं आहे. आपल्या मुलांचा मृत्यू आणि पतीची प्रकृती खालावल्याने महिलाही बेशुद्ध अवस्थेत आहे.
डोक्यावर फेटा, काळा चष्मा... राघव चड्ढांचा रॉयल वेडिंग लुक!