Aditya-L1 यान सूर्याकडे झेपावणार, LIVE लाँचिंग पाहण्यासाठी असं करा रजिस्ट्रेशन
Photo Credit; instagram
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर भारत आता सूर्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. ISRO, 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11:50 वाजता आदित्य-L1 मिशन लाँच करणार आहे.
Photo Credit; instagram
या मोहिमेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्रो मंगळवारी (२९ ऑगस्ट) दुपारी १२ वाजल्यापासून नोंदणी सुरू करणार आहे.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला हे लॉन्चिंग पाहायचे असेल, तर इस्रोने जारी केलेल्या लिंकवर जाऊन नोंदणी करू शकता.
Photo Credit; instagram
तुम्हालाही श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून लॉन्चिंग पाहायचं असल्यास तुम्ही lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION/index वर जाऊन नोंदणी करू शकता.
Photo Credit; instagram
आदित्य एल-1 मोहिमेद्वारे, इस्रोला सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवरील प्रभाव, विशेषत: ओझोन थर आणि अवकाशातील हवामानाची गतिशीलता यांचा अभ्यास करण्याची संधी आहे.
Photo Credit; instagram
भारत प्रथमच सूर्यावर संशोधन करणार आहे. पण आतापर्यंत एकूण २२ मोहिमा सूर्याकडे पाठवण्यात आल्या आहेत.
Photo Credit; instagram
ज्या देशांनी या मोहिमा पूर्ण केल्या आहेत त्यात अमेरिका, जर्मनी, युरोपियन स्पेस एजन्सीचा समावेश आहे.