आराध्या बच्चन ही बॉलिवूडची सर्वात आवडती स्टारकिड्स आहे. शुक्रवारी रात्री ती आई ऐश्वर्या रायसोबत मुंबई विमानतळावर दिसली.
Photo Credit; instagram
एअरपोर्टवर ऐश्वर्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तर आराध्याने निळ्या रंगाची हुडी आणि काळी जीन्स घातली होती.
Photo Credit; instagram
ऐश्वर्या तिच्या 12 वर्षांच्या मुलीचा हात धरून विमानतळाच्या दिशेने निघाली. मग तिथे उपस्थित पापाराझींनी त्यांना घेरलं.
Photo Credit; instagram
फोटो काढण्याच्या घाईत काही पापाराझी आपला तोल गमावताना दिसले, ज्याला पाहून ऐश्वर्या म्हणाली, 'काळजी घ्या, तुम्ही लोक पडाल'.
Photo Credit; instagram
आजूबाजूला कॅमेरे पाहून आराध्याही थोडी अस्वस्थ दिसली.
Photo Credit; instagram
त्यांच्यासोबत पापाराझींचं हे वर्तन पाहून चाहतेही थोडे नाराज झाले. अनेक चाहत्यांनी कमेंट केली की, 'फोटो काढण्याची ही कुठली पद्धत? किमान त्यांना आरामात बाहेर पडू द्या.'
Photo Credit; instagram
काही यूजर्सनी ऐश्वर्याला सल्ला दिला की आता आराध्या मोठी झाली आहे. तिचा हात धरून सर्वत्र चालणे योग्य नाही.
लग्न नकोच! 'या' मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय