Nitin Desai: कलेचा निस्सीम चाहता गेला, स्टुडिओतच संपवलं आयुष्य
Photo Credit; instagram
बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे.
Photo Credit; instagram
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी त्यांच्या कर्जतमधील स्टुडिओत गळफास घेऊन जीवन संपवलं.
Photo Credit; instagram
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत.
Photo Credit; instagram
नितीन देसाई यांनी हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो यांसारख्या अनेक चित्रपटांचे आणि राजा शिवछत्रपती या मालिकेचा सेट डिझाइन केला होता.
Photo Credit; instagram
नितीन देसाईंना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ते दरवर्षी लालबागच्या राजाचाही सेट डिझाइन करायचे.
Photo Credit; instagram
मे महिन्यात एका जाहिरात संस्थेने देसाई यांच्यावर ५१.७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचाही आरोप केला होता.
Photo Credit; instagram
एजन्सीने तीन महिने काम करूनही देसाई यांनी पैसे दिले नसल्याचे सांगितले होते. मात्र, नितीन देसाई यांनी हे आरोप फेटाळून लावले.
Photo Credit; instagram
यापूर्वीही एजन्सीने आपल्यावर असेच आरोप केले होते, असे ते म्हणाले होते.
'घटस्फोट झाला, माझा पार्टनर..' लग्नाआधी आई झाल्यावर अभिनेत्री ट्रोलर्सना काय म्हणाली?