Photo Credit; instagram

Arrow

Chandrayaan-3: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार लँडर, पण तिथे असं आहे तरी काय?

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय अंतराळ संस्था इस्रोचे चांद्रयान-3 लँडर मॉड्यूल (LM) आज (23 ऑगस्ट) संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

या यशस्वी लँडिंगनंतर, भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनून इतिहास रचणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आता अवघे काही तास उरले आहेत. इस्रोच्या या मोहिमेवर भारतासह जगभरातील शास्त्रज्ञ आणि सर्वसामान्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 उतरण्याचा प्रयत्न करेल हे अत्यंत रहस्यमयी मानलं जातंय.

Photo Credit; instagram

Arrow

नासाचे म्हणणे आहे की, येथे असे अनेक खोल खड्डे आणि पर्वत आहेत, ज्यांच्या सावलीच्या पृष्ठभागावर कोट्यवधी वर्षांपासून सूर्यप्रकाश पडलेला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच चांद्रयान-3 ने चंद्राचे काही फोटो पाठवले होते. ज्यामध्ये बरेच खड्डे पाहिले.

Photo Credit; instagram

Arrow

सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वी खगोलीय पिंडांच्या टक्करामुळे चंद्रावर हे खड्डे तयार झाले होते. या खड्ड्यांना इम्पॅक्ट क्रेटर असेही म्हणतात. 

Photo Credit; instagram

Arrow

चंद्राचा हा दक्षिण ध्रुव भाग 2500 किलोमीटर रुंद आहे. यासह आठ किलोमीटर खोल खड्ड्यांच्या काठावर ते स्थित आहे. ज्याला सौरमालेतील सर्वात जुनं इम्पॅक्ट क्रेटर देखील म्हटलं जातं. 

Photo Credit; instagram

Arrow

नासाच्या माहितीनुसार, चंद्राच्या या भागात सूर्य क्षितिजाच्या खाली किंवा किंचित वर राहतो. अशा स्थितीत दिवसा येथे फार कमी प्रकाश पोहोचतो. यावेळी तापमान 54 अंश सेल्सिअसपर्यंत राहते.

महिलेने फॉलो केलं 'लायन डाएट'; दोनच गोष्टी खाऊन घटवलं 19 किलो वजन

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा