Celina Jaitly: डिप्रेशन, मूल गमावलं अन्..., अभिनेत्रीची भावनिक पोस्ट चर्चेत
41 वर्षीय सेलिना जेटली आठवेय का? तीच जिने २००१ मध्ये 'मिस इंडिया'चा किताब जिंकला होता. ती एक अभिनेत्रीही आहे.
सध्या सेलिना कुटुंबासह परदेशात राहते. तिला वर्कआउट्स करायला आवडतात.
अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती तिच्या पर्सनल लाईफचे अपडेट्स शेअर करताना दिसते.
यावेळी सेलिनाने एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये ती जिम वेअरमध्ये दिसत आहे.
सेलिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ती परफेक्ट नाही, पण ती कधीही कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटत नाही.'
सेलिनाने लिहिले, 'मला अनेक हर्निया, डायस्टॅसिस रेक्टी आहे. हे तेव्हा घडलं जेव्हा मला जुळी मुले होणार होती.'
"दुसऱ्या गरोदरपणात तर मी मरता-मरता वाचले. माझी फुफ्फुसं खराब होण्याच्या मार्गावर होती."
'जेव्हा मला कळाले होते की, माझ्या आई-वडिलांचा आणि माझ्या एका मुलाचे निधन झाले तेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेले होते.'
'दररोज मला असे वाटते की मला सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल. मी स्वतःला आरशात ओळखू शकत नाही. पण नंतर मला वाटते की मला आयुष्यात पुढे जात राहिले पाहिजे.'
'मी माझ्या पाठबळाने स्वत:ला सुधारलं. ज्या महिला स्वत:ला कमी लेखतात, त्यांनी उठा आणि सकारात्मक विचारांनी जीवनात पुढे जा. कधीही हार मानू नका."
सेलिना जेटलीने ही पोस्ट शेअर करत सर्व महिलांना प्रेरणा दिली आहे.
Rani Mukherji : यश चोप्रा नव्हते खूश, हट्टापायी आईने राणी मुखर्जीला स्वीकारलं