Arrow

सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी पित असाल तर, सावधान...

Arrow

सकाळी गरम पाणी पिणे हे फायदेशीर असते, त्याचा फायदा तुमच्या शरीराला होतोच, त्यामुळे पचनक्रियाही सुधारत असते.

Arrow

गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील सर्व विषारी द्रव्ये बाहेर पडतात.मात्र काही वेळा लोकं  सकाळी गरम पाणी पिताना काही चुका करतात, ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होते.

Arrow

सकाळी पाणी पिताना हे लक्षात ठेवले पाहिजे की, ते जास्त गरम नसावे. खूप गरम पाणी प्यायल्याने तोंड, घसा आणि पचनसंस्थेतील काही गोष्टींना नुकसान पोहचते.

Arrow

गरम पाणी पिताना ते स्वच्छ आहे किंवा नाही ते आधी तपासावे. त्यानंतर स्वच्छ पाणीच गरम करून ते कोमट झाल्यावरच प्यावे.

Arrow

रात्री झोपल्यानंतर रात्रभर आपले तोंड बंद असते, त्यामुळे तोंडात बॅक्टेरिया असतात. त्यामुळे ब्रश करूनच पाणी प्यावे नाही तर बॅक्टेरिया पोटात जाऊ शकतात.

Arrow

गरम पाण्याचे सेवन करताना ते हळूहळू पिणे महत्वाचे असते. कारण त्यामुळे शोषण करण्यास वेळ मिळत असतो. 

Arrow

प्लास्टिकच्या डब्यातून किंवा प्लास्टिकच्या ग्लासमधून कधीही गरम पाणी पिऊ नका, त्यासाठी तुम्ही स्टीलचेच ग्लास वापरा.

Disha patani-mouny roy : बिकिनी अन् बीचवर मस्ती, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा