'हे' स्टार किड्स का झाले फ्लॉप?, बॉलिवूडने नाकारलं!
Photo Credit; instagram
तनिषा मुखर्जी झलक दिखला 11 चा भाग होणार आहे. तनिषाचे म्हणते, काजोल, अजय देवगण हे तिच्या कुटुंबातील स्टार आहेत. पण ती स्वत:ला स्टार मानत नाही.
Photo Credit; instagram
तनिषाने 2003 मध्ये Sssshhh या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले. पण ती बहीण काजोलसारखी यशस्वी होऊ शकली नाही.
Photo Credit; instagram
केवळ तनिषाच नाही तर अनेक स्टार किड्स आहेत, ज्यांना त्यांच्या आई-वडील किंवा भावंडांसारखी प्रसिद्धी मिळाली नाही.
Photo Credit; instagram
शिल्पा शेट्टीप्रमाणेच शमिता शेट्टीनेही मोहब्बतें या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री केलेली. परंतु आजपर्यंत तिला अपेक्षित यश मिळालेले नाही.
Photo Credit; instagram
लव सिन्हा हा शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा आहे. एकीकडे लवची बहीण सोनाक्षीने आपला ठसा उमटवला आहे. पण लवची इंडस्ट्रीतील कारकीर्द फ्लॉप ठरलीय.
Photo Credit; instagram
उदय चोप्रा हा बॉलिवूड अभिनेता-निर्माता आहे, त्याने मोहब्बतें, धूम, मेरे यार की शादी है चित्रपटांमध्ये काम केलेलं. मात्र सध्या तो चित्रपटांपासून दूर आहे.
Photo Credit; instagram
तुषार कपूरचे वडील जितेंद्र हे बॉलिवूडचे सुपरहिट हिरो होते. तर बहीण एकता कपूर टेलिव्हिजन क्वीन आहे. पण तुषारला तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही
Photo Credit; instagram
बॉलिवूड कुटुंबातील असल्याने या सर्व स्टार किड्सना इंडस्ट्रीत एंट्री मिळाली, पण त्यापैकी एकही दीर्घकाळ टिकू शकला नाही.