गुलाम हैदर करणार तिसरं लग्न! सीमाबद्दल काय म्हणाला?
Photo Credit; instagram
पाकिस्तानातून पळून भारतात आलेल्या सीमा हैदरचा पती गुलाम हैदर लवकरच तिसरा विवाह करणार आहे.
Photo Credit; instagram
त्याने स्वतः पाकिस्तानी यूट्यूबर मोहसिनच्या चॅनलद्वारे ही माहिती दिली. लवकरच तिसरं लग्न करणार असल्याचं सांगितलं.
Photo Credit; instagram
यासोबतच तो म्हणाला की, लवकरच भारतातही जाणार आहे. सीमासोबत येईल किंवा नाही माहित नाही. पण, मुलांना तो नक्कीच आपल्यासोबत घेऊन जाईल.
Photo Credit; instagram
सीमाचा पती गुलाम म्हणाला, 'त्याला व्हिसा बनवण्यात काही अडचणी येत आहेत. त्यामुळे तो भारतात येऊ शकत नाही. पण अल्लाला जर मान्य असेल तर तो नक्कीच भारतात येईल.'
Photo Credit; instagram
गुलाम आधी म्हणत होता की तो सीमावर खूप प्रेम करतो आणि तिला स्वीकारण्यास तो तयार आहे. पण आता गुलामचं वेगळंच म्हणणं आहे.
Photo Credit; instagram
गुलामने भारत सरकारला त्याची मुलं परत करण्याचे आवाहन केले. तो कराचीचा रहिवासी आहे. मात्र नोकरीच्या निमित्ताने तो सौदी अरेबियात राहतो.
Photo Credit; instagram
गुलाम आधीच विवाहित होता आणि सीमासोबत त्याचे दुसरे लग्न झाले होते. सीमाचे म्हणणे आहे की, तिला गुलामसोबत लग्न करायला जबरदस्ती लावलं होतं.
Photo Credit; instagram
दुसरीकडे गुलाम म्हणतो, दोघांनी प्रेमविवाह केला होता. सीमाच्या सांगण्यावरूनच त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता.
Shaharukh Khan ने लेकीचं केलं कौतुक, मुलांच्या संगोपनावर काय म्हणाला?