Arrow

पहाटे लवकर उठण्यासाठी अलार्म लावत असाल तर आधी 'हे' वाचा

Arrow

रात्री झोपण्यापूर्वी अलार्म लावणे ही सगळ्यांची सवय आहे. मात्र ही रोजची सवय तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

Arrow

अलार्म वाजल्यानंतर अचानक जाग येते. त्यामुळे तुमच्या हृदयावर आणि रक्तदाबावरही त्याचा वाईट परिणाम होतो.

Arrow

जेव्हा अलार्म वाजतो तेव्हा ते तुमच्या शरीराच्या नैसर्गिक झोपेत व्यत्यय येत असतो. त्यामुळे त्याचा तोटा शरीराल होत असतो.

Arrow

मानवी शरीर हे नैसर्गिकरित्या चालणारे आहे. त्यामुळे 24 तासांच्या एका नैसर्गिक घड्याळानुसारच झोप-जागण्याची प्रक्रिया सुरु असते. त्यामुळे सूर्याच्या उगवण्याशी आणि मावळण्याशी त्या गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. 

Arrow

तुम्ही झोपेत असताना अचानक अलार्म वाजला तर हृदयावर दबाव येत असतो. कारण तुमचे शरीर अचानक गाढ झोपेतून जागे होते असते.

Arrow

जेव्हा अलार्म वाजतो तेव्हा शरीरात तणावाचे हार्मोन्स वाढवतात. शरीरात स्ट्रेस हार्मोन्स अचानक वाढल्यामुळे रक्तदाब आणि हृदयाची गती प्रचंड वाढते.

Arrow

सकाळी उठण्यासाठी अलार्म सेट केल्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. त्याचा तुमच्या मूडवर नकारात्मक असा परिणाम होतो. त्यामुळे मूड सुधारण्यासाठी आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे.

Arrow

अलार्ममुळे तुम्ही ज्यावेळी उठता तेव्हा तुम्हाला चिडचिडेपणा, चिंता आणि तणावाचाच सामना करावा लागत असतो.

Arrow

त्यामुळे जर तुम्हालाही अलार्मशिवाय उठायचे असेल, तर तुम्ही चांगली लाईफस्टाईल पाळा. त्यामुळे तुमची रात्री झोप पूर्ण होऊन सकाळी लवकर उठण्याची सवयही लागेल.

Arrow

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करा, पुस्तक वाचा आणि मोबाईल फोनपासून सतत दूर राहा. त्यामुळे तुमची झोप पूर्ण होते. आपल्या शरीराल किमान 7 ते 9 तासांच्या झोपेची गरज आहे. 

Arrow

सकाळी लवकर झोपेतून जागे झाल्यानंतर प्रथम तुमच्या खिडकीचे पडदे उघडा. त्यामुळे सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवेचा तुम्हाल त्याचा फायदा होईल.

‘या’ गोष्टीमुळे तुमच्या घरात लक्ष्मी येईल धावत …

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा