Photo Credit instagram

Arrow

Indian Idol हा रिअ‍ॅलिटी शो नसून 'ढोंग'? सेलिब्रिटींनी केलं उघड...

Arrow

सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडॉल किती खरं, किती खोटं यावर अनेकदा प्रश्न केले जातात. टीआरपीसाठी शोमध्ये काहीही दाखवतात असे आरोप होत आहेत.

Arrow

स्पर्धकांच्या भावूक कहाण्या, जजेसचे रडणे, लव्ह अँगल, प्रशंसा अशा अनेक गोष्टी शोशी निगडीत आहेत.

Arrow

यामुळे इंडियन आयडॉल शो दरवर्षी ट्रोल होतो. याविषयी काही असे सेलेब्स आहेत जे याबाबत उघड बोलले आहेत. 

Arrow

मिनी माथुरने इंडियन आयडॉलचे 6 सीझन होस्ट केले आहेत. शो सोडण्यामागचे कारण म्हणजे शोमध्ये कोणतेही तथ्य उरलेलं नाही. 

Arrow

या शोमध्ये फक्त पैसे कमवण्यावर लक्ष दिलं जातं असं मिनी माथूरने सांगितले.

Arrow

किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार मेकर्सवर संतापला होता. जेव्हा निर्मात्यांनी त्याला स्पर्धकांची खोटी प्रशंसा करण्यास सांगितले होते.

Arrow

अमित कुमारने सांगितले, त्यांनी पैशांमुळे हा शो करण्यास होकार दिला, या वक्तव्यावरून बराच गोंधळ उडाला होता.

Arrow

इंडियन आयडॉल 1 विजेता अभिजीत सावंतही शोवरून बोलला होता. 'निर्मात्यांनी गाण्यावर लक्ष द्यायला हवं,' असे तो म्हणाला.

Arrow

अभिजीतच्या मते, रिअ‍ॅलिटी शोमध्ये लव्ह अँगल तयार केला जातो कारण प्रेक्षकांना मसाला हवा असतो. पण आता लोकांना सर्व समजते.

Arrow

सुनिधी चौहान इंडियन आयडॉलची जज होती. स्पर्धकांचे खोटे कौतुक करण्यास सांगितलं जायचं जे ती करू शकली नाही. यामुळे तिने शो सोडला.

Arrow

इंडियन आयडॉलच्या फेक रिअ‍ॅलिटीमुळे सोनू निगमलाही शो सोडावा लागला होता. 

Arrow

सोनू म्हणाला होता, 'जज म्हणून आम्ही स्पर्धकांना शिकवायला आलो आहोत. जर नेहमी तुमची वाहवाह केली तर कसे होईल? आम्ही मुलांना बिघडवायला आलो नाही.'

मध्यरात्री 90 फूट उंच मोबाइल टॉवर का चढला व्यक्ती?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा