IPL 2023: कोहली कर्णधार पुन्हा ठरला किंग! सगळ्यानाच टाकलं मागे
IPL 2023 मध्ये, विराट कोहलीने पुन्हा एकदा पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद स्वीकारले. यासह त्याने कर्णधारपदाचे अनेक विक्रमही केले.
या सामन्यात कोहलीची कर्णधारपदी दमदार खेळी पाहायला मिळाली. त्याने 47 चेंडूत 59 धावांची खेळी केली.
RCB चा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस प्रभावशाली खेळाडू म्हणून फलंदाजीला मैदानात उतरला त्यावेळी त्याने 84 धावांची खेळी खेळली.
विराटने 555 दिवसांनी या सामन्यात RCB चे नेतृत्व केले. आतापर्यंत त्याने 141 सामन्यांमध्ये RCB चे नेतृत्व केले आहे.
याआधी, किंग कोहलीने 11 ऑक्टोबर 2021 रोजी एलिमिनेटर सामन्यात शेवटच्या वेळी RCB चे नेतृत्व केले होते.
तसेच विराट कोहलीने पंजाब किंग्ज विरुद्ध कर्णधार असताना अनेक विक्रम केले. सर्व प्रकारच्या T20 सामन्यांमध्ये त्याने कर्णधार म्हणून एकूण 6510 धावा केल्या आहेत.
आरसीबीचे कर्णधार असताना विराट कोहलीने आयपीएलमध्ये 4940 धावा केल्या आहेत. तो आघाडीवर असून कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने 4615 धावा, रोहित शर्माने 3789 धावा केल्या आहेत.
Sonam Kapoor: देसी स्टाइलमध्ये अॅपलच्या CEO सोबत कुठे पोहोचली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री?