Malaika चा 11 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, 'ती' पोस्ट का होतेय व्हायरल?
Photo Credit; instagram
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर वेगळे झाले आहेत का? गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या चर्चेत आहेत.
Photo Credit; instagram
अलीकडे मलायका आणि अर्जुन ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान डिनर डेटवर दिसले तेव्हा चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दोघांना एकत्र पाहून अनेकांना आनंद झाला.
Photo Credit; instagram
पण मलायकाच्या नव्या पोस्टने चाहत्यांना पुन्हा गोंधळात टाकलं. त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने पुन्हा एकदा पेट घेतला आहे.
Photo Credit; instagram
मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहिलं, 'तुम्ही स्त्रीशी ज्या प्रकारे वागता ते तिचे प्रतिबिंब बनते.'
Photo Credit; instagram
'तिची वागणूक तुम्हाला आवडत नसेल, तर आधी तुम्ही तिच्याशी कसे वागता ते पाहा.'
Photo Credit; instagram
मलायकाची ही पोस्ट पाहिल्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे चाहत्यांना वाटले. मात्र, सत्य काय आहे हे जोडपेच सांगू शकतील.
Photo Credit; instagram
यापूर्वी अर्जुन कपूरची अभिनेत्री कुशा कपिलासोबतची जवळीक वाढल्याच्या बातम्या आल्या होत्या.
Photo Credit; instagram
मलायकाच्या ओणम सेलिब्रेशनमध्येही अर्जुन गायब होता. मात्र, दोघांनीही अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.
Photo Credit; instagram
या कपलच्या नात्याबद्दल सांगायचं तर, मलायका बॉयफ्रेंड अर्जुनपेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे.