राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा करत अध्यक्ष पदावरून आज निवृत्ती घेतली.
Photo Credit; instagram
त्यांच्या या निर्णयानंतर उपस्थित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी याला विरोध केला. सर्वजण भावूक झाले.
Photo Credit; instagram
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ही ढसाढसा रडले.
Photo Credit; instagram
त्यांनी भावूक होत शरद पवारांना काही प्रश्न केले. ते म्हणाले, 'आम्ही शरद पवारांच्या नावाने मतं मागतो, आज शरद पवारच बाजूला गेले तर आम्ही लोकांसमोर कुणाच्या नावानं जायचं?'
Photo Credit; instagram
'शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेऊ नये हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशाच्या राजकारणासाठी गरजेचं आहे.'
Photo Credit; instagram
'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्या नावानेच ओळखला जातो. त्यांना असं अचानक बाजुला जाण्याचा हक्क नाही.'
Photo Credit; instagram
'त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला सर्वांना या पुढेही पाहिजे. आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे पाहून राजकरण केले.'
Photo Credit; instagram
'त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय मागे घ्यावा.' अशी विनंती जयंत पाटीलांनी यावेळी केली.
शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण? 'हे' नेते ठरवणार