Kareena Kapoor च्या तुम्हाला माहित नसलेल्या 'त्या' सवयी..
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्यासाठी आजचा दिवस खास आहे, कारण तिचा 'जाने जान' हा चित्रपट प्रदर्शित झाला.
Photo Credit; instagram
करिनाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या काही विचित्र सवयींबद्दल आपण जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
करीनाचं नाव करीना नसून घरच्यांनी सिद्धिमा ठेवलं होतं. नंतर तिच्या आईने 'अॅना कॅरेनिना' या प्रसिद्ध पुस्तकापासून प्रेरित होऊन तिचं नाव करीना ठेवलं.
Photo Credit; instagram
करिनाला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. मिठीबाई महाविद्यालयातून तिने वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. पुढे तिने लॉचं शिक्षण घेतलं.
Photo Credit; instagram
एवढंच नाही तर एकेकाळी तिने हार्वर्ड विद्यापीठातून मायक्रो कॉम्प्युटरचा कोर्सही केला होता. पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं आणि ती बॉलिवूडमध्ये आली.
Photo Credit; instagram
करीनाला चित्रपटांमध्ये अभिनय करताना पाहिलं असेल पण तिने चित्रपटांमध्ये गाणीही गायली आहेत. 2002 मध्ये आलेल्या 'देव' चित्रपटातील 'जब नहीं आये' गाण्यात तिचा आवाज आहे.
Photo Credit; instagram
करिनाला घरचं जेवण आवडतं. ती प्रत्येक जेवणासोबत एक चमचा तूपही घेते.
Photo Credit; instagram
तसंच, करिनाला नखं खाण्याची सवय आहे. तिला अनेकदा कॅमेऱ्यातही कॅप्चर करण्यात आलं आहे.