उंदराची हत्या! 30 पानी आरोपपत्र जारी, किती भोगावी लागणार शिक्षा?
उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये 25 नोव्हेंबरला घडलेल्या उंदराच्या हत्येची घटना सर्वत्र चर्चेत आहे.याप्रकरणी पोलिसांनी ३० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सामान्य माणसांपासून ते कायदेतज्ज्ञांपर्यंत सर्वांना जाणून घ्यायचे आहे आरोपपत्रात काय लिहिले आहे? उत्तर प्रदेशमधील पानवाडी चौकातील हे प्रकरण आहे.
मनोज नावाच्या व्यक्तीने (आरोपी) उंदराला दगडाला बांधून नाल्यात बुडवले.
याठिकाणाहून जाणाऱ्या विकेंद्र शर्मा या प्राणीप्रेमीने उंदराला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मृत्यू झाला. नंतर विकेंद्रने पोलिस स्टेशन गाठले.
विकेंद्रने आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला. जिल्ह्यात उंदराचे शवविच्छेदन करण्याची सोय नव्हती. पोलिसही हे प्रकरण गांभीर्याने घेत नव्हते.
विकेंद्र कठोर कायदेशीर कारवाईसाठी शवविच्छेदन करून घेण्यावर ठाम राहिला.आयव्हीआरआय बरेलीमध्ये शवविच्छेदन झाले.
अशा स्थितीत तपासणीनंतर दिलेल्या अहवालात उंदराचे यकृत आणि फुफ्फुसे आधीच खराब असल्याचे म्हटले आहे.
उंदराचा मृत्यू नाल्याच्या पाण्यात बुडल्यामुळे नसून गुदमरल्यामुळे झाल्याचे अहवालात नमूद झाले. तो आधीच अनेक आजारांनी त्रस्त होता.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. नंतर पोलीस ठाण्यातूनच जामीन मंजूर करण्यात आला. 5 दिवसांनी मनोज कोर्टात पोहोचला आणि म्हणाला,' मी माफी मागतो.'
या प्रकरणी वनविभागाचे डीएफओ अशोक कुमार सिंह म्हणाले, 'उंदराला वन विभाग कायदा 5 अंतर्गत वॉर्मिंग श्रेणीत ठेवण्यात आले आहे.'
'उंदीर मारणे हा गुन्हा ठरत नाही, परंतु 'क्रूल्टी टू अॅनिमल्स अॅक्ट' अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे, त्यामुळे तो चुकीचाही मानता येणार नाही.'
सीओ सिटी आलोक मिश्रा यांनी सांगितले की, 'मनोज कलम 11 (प्राण्यांना क्रूरता प्रतिबंधक कायदा) आणि कलम 29 (प्राण्यांना मारणे किंवा अपंग करणे) मध्ये आरोपी आढळला आहे.'
कायदेतज्ज्ञांच्या मते, 'प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत 10 रुपये ते 2 हजार रुपये दंड आणि 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते. कलम २९ अन्वये ५ वर्षे तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे.'
Suhana Khan चा रेड हॉटनेस! हाय हील्समध्ये चालणे झाले कठीण अन् यूजर्स म्हणाले..