ब्रेकअप झालं? जया किशोरीच्या खास टिप्स बदलून टाकेल आयुष्य
तुम्हाला जर जग जिंकायचे असेल तर तुमच्यामध्ये हिंमत ठेवा, आयुष्यात कधी एकदा कुणी हरलं म्हणजे भिकारी होत नाही आणि एकदाच जिंकून कधी कोण सिकंदर होत नाही.
ज्या माणसांच्या आयुष्यात जर प्रेमात आलेल्या अपयशामुळे त्यांच्या आयुष्यात नैराश्य आले असेल त्यांच्या आयुष्यात जया किशोरींनी सांगितलेल्या काही गोष्टींचा मनावर प्रचंड परिणाम होता.
जी माणसं मनानं पराभूत झालेली असतात, अशा लोकांसाठी जया किशोरी यांचे शब्द म्हणजे त्यांच्यासाठी संजीवनी ठरत असतात.
जया किशोरींनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही गांभीर्याने मनावर घेतल्या तर काही माणसं कधीच डिप्रेशनमध्यही जाणार नाहीत. आयुष्यातील नव्या विजयासाठी ती नवा रस्ता शोधून काढतील
जया किशोरी यांनी अनेक ऋषीमुनींचे विचार सोपे करुन सांगितले आहेत, त्यामुळेच तुम्ही वेळेचा आदर केला तर काळही तुमचाही आदर करतो अशा सोप्या शब्दात त्यांनी वेगळं तत्वज्ञान सोपं करुन सांगितलं आहे.
सध्याच्या काळात आयुष्यातील वेळेची किंमत समजणे खूप गरजेचे आहे. तो वेळच तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रगतीपथाकडे घेऊन जाणारा असतो.
जया किशोरी म्हणतात की, तुमची श्रद्धा असेल तर तुम्हाला पर्वतही हलवता येतो असंही त्यांना सांगतात.